

करोणा ची प्राथमिक लक्षणे दिसल्यास काय करावे? अंगदुखी , ताप , थकवा डोकेदुखी यासाठी प्राथमिक लक्षणे दिसताच स्वतःला विलगीकरण यामध्ये न्यावे. घरात सुद्धा मास्क लावावा व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ताप अंग दुखी वरील क्रोसिन , कालपोल सारखी गोळी घ्यावी. कमीत कमी तीन ते चार लिटर पानी रोज प्यावे. ताजे अन्न खावे , दोन वेळा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात .वरील लक्षणे कमी जाणवल्यास गोळी बंद करून एक ते दोन दिवस वाट पहावी काही त्रास न झाल्यास नियमित मास्क वापरून योग्य ते अंतर ठेवून व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुऊन तुम्ही तुमची रोजची कामे करू शकता. वरील सर्व काळजी घेऊन सुद्धा जर तिसऱ्या चौथ्या दिवशी ही ताप खोकला असेल किंवा पहिल्या दिवसापासूनच ताप खोकला व श्वसनाचा त्रास असेल तर rt-pcr तपासणी करणे आवश्यक तसेच करोना बचावाची त्रिसूत्री पाळणे खूप महत्त्वाचे आहे. || प्रश्न 3 सामान्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने यावर लवकर मात करण्यासाठी काय करावे? सामान्य लक्षणे असलेली व्यक्ती उपचार घेत असेल तेव्हा आहारात जास्त प्रमाणात प्रथिने म्हणजेच , प्रोटिन्स , विटामिन्स फायबर व द्रवपदार्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण जर शाकाहारी असाल तर योग्य प्रमाणात मोड आलेली कडधान्ये सोयाबीन , डाळी यांचा समावेश रोजच्या आहारात करावा .तसेच पालेभाज्या , फळं ड्रायफ्रुट्स ही नियमित खावी मांसाहारी व्यक्तींनी उकडलेली अंडी, चिकन , मटण , मासे पालेभाज्या फळे व सुकामेवा आहारात घ्यावी . ब्रेड , खारी बिस्किटे यासारखी बेकरीतील पदार्थ वर्ज करावे. घरी बनवलेली ताजे , कमी तेलकट , कमी प्रमाणात तिखट व योग्य प्रमाणात मीठ असलेले अन्न घ्यावे . इलेक्ट्रॉल, glucon-d यांसारखे पावडर पाण्यात मिसळून दोन ते तीन वेळा द्यावे .यांनी अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल .तसेच लिंबू सरबत , नारळपाणी ताक यासारखे घरी असणारे द्रवपदार्थ घ्यावेत . रोज श्वासाचे व्यायाम , रूममध्येच सहा मिनिटे चालण्याचा व्यायाम , करावा. मनोरंजनासाठी पुस्तके, टीव्ही बघणे, गाणी ऐकणे , चित्रकला पेंटिंग यांचा आधार घ्यावा . रोज किमान अर्धा तास ध्यान धारणा करावी .सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक राहणे .पंधरा दिवसांमध्ये कधीही मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी घेणे . परत परत करोनाबद्दलची माहिती, बातम्या , गोष्टी , इतरांचे चांगले-वाईट अनुभव यामध्ये जास्त वेळ घालवू नये. एकटे वाटत असल्यास मित्र नातेवाईक घरातील व्यक्ती यांच्याशी फोनवरून गप्पा मारणे व जुन्या-नव्या आठवणींना उजाळा देणे. तसेच मिळालेल्या विलगीकरण संधीचा फायदा कसा करून घ्यायचा याचा विचार करून तसे आचरण करावे. कमीत कमी आठ ते दहा तासांची झोप पुर्ण करणे व दिवसभरात तीन ते पाच लिटर पाणी पिणे .वरील सर्व गोष्टी सामान्य त्रास असलेल्या व्यक्तींना करोना वर मात करण्यास उपयुक्त ठरू शकते. || प्रश्न 4 .संसर्ग बळावलेल्या रुग्णांसाठी रेमदेसिविर इंजेक्शन व इतर औषधोपचार यांबद्दल माहिती सांगा? संसर्ग खूप बळावल्यास रुग्णांना वेगवेगळ्या औषधोपचारांची गरज पडते .करोना संसर्ग हा विषाणूजन्य संसर्ग आहे तो सुरुवातीला मनुष्याच्या फुफ्फुसांना संसर्ग करतो , व आटोक्यात न आल्यास हळूहळू इतर अवयव सुद्धा या आजारांमध्ये निकामी होऊ शकतात त्यातच रुग्णाला जर आधीच डायबेटिस, ब्लडप्रेशर, दमा किंवा इतर कुठलाही आजार ज्यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता आधीच कमी झालेली असेल अशा रुग्णांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते .या केसेसमध्ये फुफ्फुसांचा सिटीस्कॅन तपासणी, ज्याला आपण एच आर सिटी म्हणतो ती केली जाते , ज्यावर आपल्याला एक गुणतक्ता दिला जातो जो 25 पैकी असतो ज्यांच्यामध्ये संसर्ग जास्त बळावलेला असतो त्यांचा स्कोर बऱ्याचदा पंधरा च्या पुढे असतो व सोबतच पेशंटला ताप , खोकला श्वसनास त्रास व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण म्हणजेच spo2 जे साधारण मनुष्यामध्ये 98 ते शंभर टक्के पर्यंत असते ते कधीकधी 80% च्या पण पेक्षा कमी होऊ शकते ....अशा पेशंटमध्ये डॉक्टर इंजेक्शन रेमदेसिविरचा उपयोग करतात जे एक विषाणू रोधक, म्हणजेच अँटी व्हायरस औषध आहे. जे दिवसातून एक वेळा असे पाच ते दहा दिवसांसाठी रुग्णाच्या शिरेतून दिले जाते. यासोबतच रुग्णाला प्रतिजैविके म्हणजे अँटिबायोटिक सुद्धा दिले जाते. सोबतच रुग्णाच्या खालील रक्त तपासण्या करणे अत्यंत आवश्यक आहे .1. हिमोग्राम यावरून आपल्याला हिमोग्लोबिनचे प्रमाण तसेच जंतुसंसर्ग आहे का याची माहिती मिळते 2. सी आर पी या रक्तचाचणी मध्ये इन्फेक्शन चे प्रमाण किती आहे याचा अंदाज येतो याचे प्रमाण पाच च्या पुढे गेल्यास त्याला आपण वाढलेली पातळी म्हणतो जर हे प्रमाण 10 ते 20 च्या पुढे गेले तरी इन्फेक्शन सुद्धा जास्त प्रमाणात आहे असा त्याचा अर्थ होतो व आपल्याला आणखी पुढच्या वर्गातील प्रतिजैविके किंवा हायर अँटिबायोटिक्स चा वापर करावा लागतो. 3. डि डायमर ही तपासणी रक्त गोठण्याची प्रक्रिया कशी आहे याचा अंदाज वर्तविता या तपासणीचा परिणाम 250 पेक्षा कमी असल्यास त्याला नॉर्मल समजले जाते पण त्याचे प्रमाण वाढत गेल्यास रुग्णाची रक्तातील गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णाला हार्ट अटॅक किंवा अर्धांगवायू यांसारखा धोका होण्याचे प्रमाण प्रमाण वाढते . 4 .लिवर फंक्शन टेस्ट ही तपासणी आपल्याला पेशंटच्या लिव्हर चे काम करण्याची क्षमता सांगतील. 5. किडनी फंक्शन टेस्ट या आपल्याला रुग्णाच्या किडनी कशा प्रकारे कार्य करत आहेत याचा अंदाज देतात या दोन्ही तपासण्या रुग्णाच्या शरीरात बनणाऱ्या निरुपयोगी गोष्टी बाहेर काढण्याची क्षमता दाखविता. ब्लड शुगर लेव्हल कुठल्याही प्रकारचे संक्रमण शरीरात झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. वरील तपासण्या सोबत रक्ताच्या IL6. Sr.Ferritin या तपासण्या तसेच हृदयाचा कार्डिओग्राम , म्हणजेच ईसीजी देखील करण्याची गरज पडू शकते .रुग्ण जर कृत्रिम श्वासोच्छवासाचा मशीन वर असेल तर रक्ताची एबीजी चाचणी सुद्धा करावी लागते. वरील चाचण्यांचे निष्कर्ष व पेशंटची सर्व परिस्थिती बघून डॉक्टर पेशंटला इतर औषधे जशेकी साखर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी इंजेक्शन इन्सुलिन, रक्त पातळ होण्यासाठी इंजेक्शन , inj Heparin सुरू करू शकतात .तसेच पेशंटला स्टिरॉइड चालू करावे लागते. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास जास्त असेल , दम लागत असेल , spo2 80 पेक्षा कमी असल्यास कृत्रिम श्वासोच्छवास म्हणजेच व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येऊ शकते .या स्टेज पर्यंत आल्यास पेशंटच्या जीवाला धोका वाढू शकतो .शरीरातील इतर महत्त्वाचे अवयव निकामी होणे, ब्लडप्रेशर औषधोपचारांनी पण कमी राहणे , जंतुसंसर्ग वाढणे व शेवटी हृदय बंद पडणे यासारखी गुंतागुंत होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. करोना मुक्ती नंतर पुढे काय नियमावली आचरावी? मुक्त झालेल्या रुग्णांनी पुन्हा संक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. व योग्य आहार , योग्य व्यायाम व पुरेशी विश्रांती घेऊन रोजचे व्यवहार चालू ठेवावेत .परंतु हे सर्व करताना करोना त्रिसूत्रीचा अवलंब जरूर करावा. || प्रश्न पाच . आजारातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांसाठी पुढे काय दुष्परिणाम होऊ शकतात? करोना मधून बरे झाल्यानंतर जर फुप्फुसे जास्त संक्रमित झाली असतील तर दम लागण्याचा त्रास होऊ शकतो, कारण अति संक्रमणामुळे फुफ्फुसांचा भाग जो स्पंज सारखा असतो तो कडक होतो व ्यातून रक्तातील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड योग्य मार्गाने वापरण्यास अडथळा येतो. रक्ताच्या गुठळ्या बनण्याचे प्रमाण वाढू शकते. अलीकडेच पेशंटना बुरशीजन्य संक्रमण होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे यामध्ये शरीरातील अवयवांना बुरशी संक्रमण म्हणजेच फंगल इन्फेक्शन होते व ते अवयव काढून टाकण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. करोना नंतर बराच काळ अशक्तपणा अंग दुखी होऊ शकते . कोरोना नंतर पुढे वेगळी औषधे घ्यायची गरज असते का? करोन नंतर वरती सांगितल्याप्रमाणे विटामिन , रक्त पातळ ठेवणारी औषधे, साखर कंट्रोल करणारी औषधे एक ते तीन महिन्याच्या काळापर्यंत सुरू ठेवावी लागतात. || प्रश्न 6: कोरोना ची लस कोणती योग्य आहे ?लस घेतल्यानंतर चे परिणाम दुष्परिणाम जाणवतात का? सध्या आपल्या देशात को वि शील्ड व को वॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. अठरा वर्षांवरील सर्वांना ही लस दिली जात आहे. ल सि बद्दल कोणताही गैरसमज न ठेवता अठरा वर्षांवरील सर्वांनी लसीचे दोन डोस को वि शिल्ड असेल तर पहिला डोस व नंतर 12 आठवड्यांनी दुसरा डोस तर कोवॅकसीन चा पहिला डोस नंतर चार आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा. लसीकरणानंतर आजार झाल्यास त्याचे प्रमाण सौम्य असते असे निदर्शनास आले आहे. कारण लसीमुळे आपल्या शरीरात करोना विरुद्ध लढण्याची क्षमता सुरू झालेली असते .या कारणामुळे प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे .जर कोणाला कुठली एलर्जी मोठा आजार पण असेल तर लसीकरण केंद्रातील व्यक्तीला त्याची माहिती द्या ते ठरवतील की तुम्ही लस घेणे योग्य आहे का नाही. लसीचा मोठ्या प्रमाणात कुठलाही दुष्परिणाम समोर आलेला नाही. थोडाफार ताप येणे अंगदुखी होणे असे दुष्परिणाम जाणवतात. त्यासाठी डोलो नावाची गोळी , भरपूर पाणी व एक ते दोन दिवसांची विश्रांती घेतली जाऊ शकते. || प्रश्न 7:कोरोना बद्दलची भीती आणि मानसिक आरोग्य कसे राखावे? कोरोना विषयी मनात भीती न बाळगता योग्य वेळी निदान व उपचार करून घ्यावे आजारपण लपवू नये किंवा मला काही होणार नाही या भावनेत राहू नये मानसिक आरोग्य नेहमी सकारात्मक ठेवावे चांगला विचार करावा मनोधैर्य खचू देऊ नये. कारण एक वर्षात या आजारावर चांगले औषधोपचार मिळाले आहेत व आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे नेहमी सकारात्मक रहावे. स्वतःला प्रसन्न ठेवावे , आवडीच्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घ्यावे. || प्रश्न 8 : मास्क कोणता वापरावा? त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम कोणते? रोजच्या वापरासाठी कापडी मास्क उत्तम पर्याय आहे.दर दोन दिवसांनी तो स्वच्छ धुवावा व दर दोन महिन्यांनी मास्क बदलावा. सर्जिकल मास्क हा डिस्पोजेबल प्रकारात मोडतो.तो मास्क जास्तीत जास्त दोन दिवस वापरून मग टाकून द्यावा. एन नाईंटी फाईव्ह हा मास्क सुद्धा गर्दीच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलच्या आवारात जाणार असाल तर वापरावा. हा चार ते पाच दिवस वापरू शकतो.अधिक संरक्षणासाठी सर्जिकल मास्क व त्यावर कापडी मास्क वापरणे फायदेशीर ठरते. || प्रश्न 9 :घरगुती काढया विषयी मत ! घरगुती काढा म्हणजेच दूध हळद, गुळवेल काढा व इतर काढे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. || प्रश्न 10 : मास्क कोणता वापरावा? त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम कोणते? रोजच्या वापरासाठी कापडी मास्क उत्तम पर्याय आहे.दर दोन दिवसांनी तो स्वच्छ धुवावा व दर दोन महिन्यांनी मास्क बदलावा. सर्जिकल मास्क हा डिस्पोजेबल प्रकारात मोडतो.तो मास्क जास्तीत जास्त दोन दिवस वापरून मग टाकून द्यावा. एन नाईंटी फाईव्ह हा मास्क सुद्धा गर्दीच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलच्या आवारात जाणार असाल तर वापरावा. हा चार ते पाच दिवस वापरू शकतो.अधिक संरक्षणासाठी सर्जिकल मास्क व त्यावर कापडी मास्क वापरणे फायदेशीर ठरते. || covid - १९ कोरोना आणि वंध्यत्व वरील उपचार ह्या संबंधी डॉक्टर राहुल वीर यांचे खास मार्गदर्शन https://maharashtra24.com/?p=10963 || covid-19 कोरोना व्हायरस मध्ये गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी ; डॉक्टर राहुल वीर https://maharashtra24.com/?p=5282 ||
We hate spam too.