https://www.veerivfpune.com
918432321414

वंध्यत्व म्हणजे काय ? मुल न होण्याचा अवस्थेला ...

2018-11-26T13:20:43
Veer IVF-Best IVF Centre,IVF Clinic in PCMC,Pune
वंध्यत्व म्हणजे काय ?मुल न होण्याचा अवस्थेला ...

वंध्यत्व म्हणजे काय ? मुल न होण्याचा अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात. ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टीलिटी म्हणतात व ज्या स्त्रीला एकदा मुल झाले असताना , पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकारला सेकंडरी इन्फर्टीलिटीअसे म्हणतात. वंध्यत्वाची समस्या किती जोडप्यांमध्ये असते? स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक संबंधातून गर्भाची निर्मिती होते. हाच गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात रुजतो, वाढतो व ९ महिन्यानंतर बाळाच्या जन्म होतो. हि अगदी नैसर्गिक क्रियेमध्ये कोठेतरी अडथळा अथवा विकार असल्यास किंवा उत्पन्न झाल्यास गर्भधारणा होत नाही. सर्वसाधारणपणे १०% जोडप्यांमध्ये ही समस्या असते व त्यांच्या वाट्याला वंध्यत्व येते, जागतिक आरोग्य संघटन (World Health Organization) च्या अनुमानाप्रमाणे संपूर्ण जगभरात वंध्यत्वाची समस्या ६००-८०० लाख जोडपी आहेत. मुल होण्यासाठी किती वर्षे वाट बघावी? स्त्री पुरुष यांच्यात लैंगिक संबंध आला कि, लगेच दिवस राहतात असे नाही किंबहुना दिवस राहण्याची नैसर्गिक शक्यता दर महिन्या जेम तेम १५- २०% च असते. त्यामुळे बहुतेक जोडप्यांना मुल होण्यसाठी काही महिने प्रयत्न करावे लागतात. अति उत्तम प्रजनन क्षमता असणार्या जोडप्याला सुद्धा दिवस राहण्यासाठी ५ ते ६ महिन्यांचा काळ लागतो व एका वर्ष अखेरीस ८०% - ९०% जोडप्याच्या प्रयत्नांना यश येते व स्त्रीला दिवस जाता एका वर्षच्या प्रयत्नांनंतर सुद्धा जर दिवस राहत नसतील तर डॉक्टरांच्या तपासणी व सल्ल्याची गरज असते. मुल होण्यासाठी फक्त पत्नीनीच तपासणी केली तर चालेल का ? नाही, कारण मुल न होण्यासाठी पुरुषांमधील २५% करणे असू शकतात व २५% जोडप्यांमध्ये दोघांमध्ये दोष आढळतात. त्यामुईल पती पत्नीने एकत्र तपासणी करणे आवश्यक आहे. गर्भ कसा निर्माण होतो ? गर्भ निर्मितीसाठी प्रामुख्याने तीन गोष्टी लागतात १) पुरुष बीज(SPERM) २) स्त्री बीज(OVUM, EGG) ३) पुरुष - स्त्री बीजाचे मिलन, पुरुष व स्त्री बीजाचे मिलन गर्भनलिकेत मध्ये होते व त्यामधून निर्माण झालेला गर्भ गर्भ्श्यात सरकावला जावून गर्भ्श्यात रुजतो. गर्भाशयात त्याचे पोषण होवून वाढतो आणि संपूर्ण वाढ झाल्यास बाळाचा जन्म होतो. स्त्री व पुरुष यांच्यातील दोष शोधण्यासाठी कोणत्या तपासण्या डॉक्टर करतात? स्त्री व पुरुष: दोघांची संपूर्ण वैद्यकीय व लैंगिक माहिती व शारीरिक तपासणी, लॅबोरेटरी तपासण्या - Hemogram, Urine, VDRL, HbsAg, BSL-F & PP, Blood Gruop स्त्री - गर्भाशय गर्भनलिका व स्त्रीबीजकोश यांच्या तपासण्या (Evaluation of Uterus, Tubes, Ovarien & Peritonial Factors), व्हजायनल सोनोग्राफी (Vaginal Sonography) गर्भाशय स्त्रीबीजकोष ब स्त्रीबीजाच्या वाढीसंबंधी तपासणी व्हीडीओ हिस्ट्रोस्कोपी (Video Laproscopy), गर्भाशय, गर्भनलिका, स्त्रीबीजकोष कोष व पोटातील इतर अवयवांची तपासणी पुरुष - वीर्य तपासणी (semen anlaysis), सोनोग्राफी (scrotal sonography), डॉपलर तपासणी(dopppler), रक्तातील हार्मोन्स तपासणी(Harmonal Test FSH, LH, Prolactin, Testosterone), पुरुषबीजाकोषाच्या तुकड्याची तपासणी (Testicular Biopsy). (पुरुषांच्या वीर्याची तपासणी करताना खालील सुचना महत्वाच्या आहेत. १) वीर्य तपासणी आधी ३ ते ४ दिवस संबंध ठवू नये.२) निर्जंतुक बाटलीमध्ये वीर्य गोळा करणे.३) अर्ध्या तासाच्या आत वीर्य लॅबोरेटरीमध्ये पोहचणे आवश्यक) IUI (Intra Uterine Insemination) म्हणजे काय ? ययात गर्भ पिशवीच्या आत वीर्य Canula ने सोडले जाते. स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या किंवा इंजेक्शन देवून गर्भाशयात अंडी तयार करतात. त्याची फॉलीक्युलर स्टडी करून ३६ तासानंतर IUI केले जाते. पतीच्या शुक्र जंतूची संख्या कमी असल्यास या पद्धतीमुळे फायदा होवून गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. टेस्ट ट्यूब बेबी (IVF) म्हजे काय? टेस्ट ट्यूब बेबीमध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात. पाळीच्या २० व्या दिवसापासून इंजेक्शन सुरु होतात. जी रोज २० ते २५ दिवस घ्यावी लागतात, मध्ये एक पाली येते व दुसर्या दिवसापासून अंदाश्यात आडणी तयार होण्यासाठी इंजेक्शन सुरु होतात. पाळीच्या ९ व्या दिवसापासून फॉलीक्युलर स्टडी करून अंडाशयातील फॉलीक्युल्सची वाढ १८ मि. मि पेक्षा जास्त झाल्यावर इंजेक्शन देवून ३६ तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सोनोग्राफीच्या सहाय्याने सुईने बाहेर काढतात. स्त्री बीज व पुरुष बीज यांचे IVF लॅबमध्येमिलन घडवून आणले जाते व तयार झालेला गर्भ तीन दिवसांनंतर गर्भाशयात सोडला जातो. ९ महिने त्याची वाढ होते व नंतर बाल जन्माला येते. साधारणपणे खालील निदान असेल तर टेस्ट ट्यूब बेबी (IVF) या प्रक्रियेची गरज लागू शकते. १) दोन्हीही गर्भनलिका बंद असणे किंवा गर्भनलिकेला जंतुसंसर्ग होणे. २) Grade III अथवा Grade IV Endometriosis चा आजार असणे. ३) पुरुष बीजांची संख्या अतिशय कमी असणे. ४) वारंवार IUI प्रक्रिया करूनही गर्भ न राहणे.

Message Us

other updates

Book Appointment

No services available for booking.

Select Staff

AnyBody

Morning
    Afternoon
      Evening
        Night
          Appointment Slot Unavailable
          Your enquiry
          Mobile or Email

          Appointment date & time

          Sunday, 7 Aug, 6:00 PM

          Your Name
          Mobile Number
          Email Id
          Message

          Balinese massage - 60 min

          INR 200

          INR 500

          services False False +918048034057